सुनेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला; ब्लॅकमेलर सासऱ्याला अटक

सुनेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला; ब्लॅकमेलर सासऱ्याला अटक

news image

पंढरपूर तालुक्यातील एका गावात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका नराधम सासऱ्यानं सुनेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल केल्याचं समोर आलं आहे.

Pandhapur Police Station

पंढरपूर पोलीस ठाणे

हायलाइट्स:

  • पंढरपूर तालुक्यातील गावात धक्कादायक घटना उघडकीस
  • सुनेला ब्लॅकमेल करणाऱ्या नराधम सासऱ्याला अटक
  • आंघोळ करताना काढला होता सुनेचा व्हिडिओ

सोलापूर: मूल होत नसल्याचे कारण पुढे करून अनैतिक संबंध ठेवण्यासाठी, सुनेचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ काढल्याप्रकरणी एका नराधम सासऱ्याला पंढरपूर तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

वाचा: हा कसला शिवसेनेचा आमदार?; मुलीवरील हल्ल्यामुळं एकनाथ खडसे भडकले!

पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील सुनेला मूल होत नव्हते. त्यामुळे दोन आठवड्यापूर्वी आरोपीने स्वतःच्या सुनेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पीडित महिलेने आरडाओरड केल्याने आरोपी सासऱ्याने तिला सोडून दिले. घडल्या प्रकाराविषयी पीडित महिलेने पतीस सांगितले होते, परंतु त्यावेळी पीडितेची समजूत काढून प्रकरण मिटवण्यात आले होते. पण २० डिसेंबर रोजी पुन्हा सकाळी आठच्या सुमारास पीडित महिला घरासमोरच्या बाथरूममध्ये अंघोळीस गेली असता आरोपी सासऱ्याने महिलेच्या न कळत मोबाइलमध्ये शूटिंग काढले. त्यानंतर आरोपीने सदरचे शूटिंग पीडित सुनेला दाखवून तुला माझ्या मुलापासून मुलबाळ होणार नाही. तू माझ्याशी संबंध ठेवले नाही तर मी तुझे अंघोळ करतानाचे हे शूटिंग पुढे पाठवीन म्हणून ब्लॅकमेल केले. त्यावेळी पीडित महिलेने फोन करण्याच्या कारणाने मोबाइल घेतला आणि आरोपी सासऱ्याची नजर चुकवून पीडितेने शूटिंग पाहून खात्री करून घेऊन तो आपल्या भावाच्या मोबाइलवर पाठवला. आरोपीने पीडित महिलेस हे शूटिंग वारंवार दाखवून तिच्या मनास लज्जा निर्माण होईल,असे वर्तन केले. पीडित महिला माहेरी गेली आणि तिने तिच्या आई-वडिलांना हा प्रकार सांगून आज पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्चे हे पुढील तपास करीत आहेत.

वाचा: संशयिताच्या खिशाला बॉलपेन सापडला, त्यानंतर जे समोर आले ते केवळ थक्क करणारे

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

या बातम्यांबद्दल अधिक वाचा

Web Title : pandharpur police arrested man for molesting and blackmailing daughter in law
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

पंढरपूर तालुक्यातील एका गावात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका नराधम सासऱ्यानं सुनेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल केल्याचं समोर आलं आहे.पंढरपूर पोलीस ठाणेहायलाइट्स:पंढरपूर तालुक्यातील गावात धक्कादायक घटना उघडकीससुनेला ब्लॅकमेल करणाऱ्या नराधम सासऱ्याला अटकआंघोळ करताना काढला होता सुनेचा व्हिडिओसोलापूर: मूल होत नसल्याचे कारण पुढे करून अनैतिक संबंध ठेवण्यासाठी, सुनेचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ काढल्याप्रकरणी एका नराधम सासऱ्याला पंढरपूर तालुका पोलिसांनी अटक केली आहे.वाचा: हा कसला शिवसेनेचा आमदार?; मुलीवरील हल्ल्यामुळं एकनाथ खडसे भडकले!पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील सुनेला मूल होत नव्हते. त्यामुळे दोन आठवड्यापूर्वी आरोपीने स्वतःच्या सुनेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पीडित महिलेने आरडाओरड केल्याने आरोपी सासऱ्याने तिला सोडून दिले. घडल्या प्रकाराविषयी पीडित महिलेने पतीस सांगितले होते, परंतु त्यावेळी पीडितेची समजूत काढून प्रकरण मिटवण्यात आले होते. पण २० डिसेंबर रोजी पुन्हा सकाळी आठच्या सुमारास पीडित महिला घरासमोरच्या बाथरूममध्ये अंघोळीस गेली असता आरोपी सासऱ्याने महिलेच्या न कळत मोबाइलमध्ये शूटिंग काढले. त्यानंतर आरोपीने सदरचे शूटिंग पीडित सुनेला दाखवून तुला माझ्या मुलापासून मुलबाळ होणार नाही. तू माझ्याशी संबंध ठेवले नाही तर मी तुझे अंघोळ करतानाचे हे शूटिंग पुढे पाठवीन म्हणून ब्लॅकमेल केले. त्यावेळी पीडित महिलेने फोन करण्याच्या कारणाने मोबाइल घेतला आणि आरोपी सासऱ्याची नजर चुकवून पीडितेने शूटिंग पाहून खात्री करून घेऊन तो आपल्या भावाच्या मोबाइलवर पाठवला. आरोपीने पीडित महिलेस हे शूटिंग वारंवार दाखवून तिच्या मनास लज्जा निर्माण होईल,असे वर्तन केले. पीडित महिला माहेरी गेली आणि तिने तिच्या आई-वडिलांना हा प्रकार सांगून आज पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्चे हे पुढील तपास करीत आहेत.वाचा: संशयिताच्या खिशाला बॉलपेन सापडला, त्यानंतर जे समोर आले ते केवळ थक्क करणारेMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.या बातम्यांबद्दल अधिक वाचाWeb Title : pandharpur police arrested man for molesting and blackmailing daughter in lawMarathi News from Maharashtra Times, TIL Network

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *